मुंबई-बदलापूर-मुंबई; जबरदस्त रेजसह PURE EV EcoDryf इलेक्ट्रिक बाईक लॉन्च
आज हैदराबाद येथील इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक Pure EV ने EcoDryft इलेक्ट्रिक बाईक भारतात लॉन्च केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकंपनीने स्वतः ही बाईक आधीच देशातील 100 हून अधिक डीलरशिपवर टेस्ट राइडिंगसाठी उपलब्ध करून दिली आहे.
ज्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही रिव्हॉल्ट इलेक्ट्रिक बाईक RV400 LA ला टक्कर देईल. या बाईकमध्ये कंपनीने अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहे. याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
कंपनीने Pure EV बाईक 99,999 रुपये एक्स-शोरूमच्या प्रारंभिक किमतीत सादर केली आहे.
कंपनीने या इलेक्ट्रिक बाईकसाठी बुकिंग सुरू केली आहे. ग्राहक Pure EV च्या अधिकृत डीलरशिपद्वारे ही बाईक बुक करू शकतात.
याचबरोबर कंपनी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून या बाईकची डिलिव्हरी सुरू करणार आहे.
ही इलेक्ट्रिक बाईक एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर 135 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते आणि 75 किमी/ताशी हाय स्पीडने धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. कॉम्प्युटर बाईक म्हणून बाईकच्या डिझाइनमध्ये अँगुलर हेडलॅम्प, पाच-स्पोक अलॉय व्हील आणि सिंगल-पीस सीट समाविष्ट आहे.
कंपनीने ही इलेक्ट्रिक बाईक चार रंग पर्यायसह लॉन्च केली आहे. यात ब्लॅक, ग्रे, ब्लू आणि रेड रंगाचा समावेश आहे.