Pure EV ची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जमध्ये गाठणार 140 किमी
इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी Pure EV आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक ETRYST 350 लॉन्च केली आहे. कंपनी याची किंमत 154,999 रुपये इतकी ठेवली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही कंपनीची पहिली बाईक आहे. जी 140 किमीच्या रेंजसह येते.
PURE EV ETRYST 350 ही बाईक भारतात विकसित केली आहे. कंपनीने देशभरातील डीलरशिपमध्ये याची विक्री सुरू केली आहे.
Pure EV ETRYST 350 ची विक्री देशभरात उपलब्ध 100 डीलरशिपद्वारे केली जाणार आहे. यात एलईडी हेडलाइट, एलईडी टेलगेट, डीआरएल आणि टर्न सिग्नल देखील मिळतात.
यासोबतच कंपनीने या इलेक्ट्रिक बाईकमध्ये 7-इंचाचा LED डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिला असून त्याचे स्पीडोमीटर आणि ओडोमीटर दोन्ही डिजिटल ठेवण्यात आले आहेत.
Pure EV ETRYST 350 मध्ये 3.5 kWh बॅटरी देण्यात आली आहे. जी कंपनीनेच विकसित केली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक बाईक एका चार्जवर 140 किमीची रेंज देते आणि हिचा टॉप स्पीड 85 किमी/तास आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ETRYST 350 ची डिझाइन अशा प्रकारे केली गेली आहे की, ही ताशी 85 किमी वेगाने धावताना देखील स्थिर राहते.
या मोटरसह ही बाईक 60 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. ही बाईक 0 - 40 किमी/ता 4.4 सेकंदात, 7.4 सेकंदात 0 - 60 किमी/ता, 75 किलो लोडसह 11.6 सेकंदात 0 - 75 किमी/ताशी वेग पकडते. ब्रेकिंगसाठी याला पुढील आणि मागील दोन्ही चाकांवर 220 मिमी डिस्क ब्रेक मिळतात आणि आकर्षक अलॉय व्हील्ससह येतो.
Pure EV ETRYST 350 मध्ये ट्यूबलेस टायर्स वापर करण्यात आला आहे. यात सस्पेन्शनसाठी पुढील आणि मागील बाजूस हायड्रॉलिक ड्युअल सस्पेंशन देण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक बाईकची लांबी 2040 मिमी, व्हीलबेस 1375 मिमी, ग्राउंड क्लिअरन्स 180 मिमी, सीटची उंची 770 मिमी आणि वजन 120 किलो आहे.
या इलेक्ट्रिक बाईकमध्ये 4.0 KW ची मोटर आहे आणि ही 84 व्होल्ट 8 amp पोर्टेबल चार्जरने चार्ज करण्यासाठी 6 तास घेते. Pure EV ETRYST 350 ला तीन राईड मोड देण्यात आले आहेत - ड्राइव्ह (60 किमी/ता), क्रॉस ओव्हर (75 किमी/ता) आणि थ्रिल (85 किमी/ता).
दरम्यान, इलेक्ट्रिक स्कूटरसोबत प्युअर ईव्ही आधीच बाजारात उपलब्ध आहे. पण आता कंपनीने पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे. यामध्ये फास्ट चार्जिंगचा पर्याय नाही. ही इलेक्ट्रिक बाईक भारतातील Revolt RV400 ला टक्कर देणार आहे.