Mini Cooper SE इलेक्ट्रिक कार लॉन्च, फक्त 7 सेकंदात पकडते 100 किमी तासाचा वेग
BMW Mini ने Cooper SE रेझोल्युट एडिशन नवीन रंगात लॉन्च केली आहे. मिनी कूपर एसई रिझोल्युट एडिशन हाय व्होल्टेज बॅटरी पॅक, इलेक्ट्रॉनिक्स आणि हाय स्पीड चार्जिंग तंत्रज्ञानासह येते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाची इलेक्ट्रिक मोटर 184 bhp (135 kW) जनरेट करते. ज्यामुळे ही इलेक्ट्रिक कार फक्त 7.03 सेकंदात 0-100 किमी/ताचा वेग पकडते.
या इलेक्ट्रिक कारमध्ये स्पोर्ट आणि ग्रीन प्लस असे दोन ड्रायव्हिंग मोड आहेत. पूर्ण चार्ज केल्यावर ही कार 234 किमीची रेंज देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.
कूपर एसई रिझोल्युट एडिशनमध्ये रिझोल्युट बॅजिंग देखील देण्यात आले आहे. ग्राहकांना ते हवे असल्यास ते नॅनूक व्हाइट किंवा पूर्णपणे काळ्या रंगात खरेदी करू शकतात.
या मॉडेलमध्ये 17-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, ज्यामध्ये तंबूच्या डिझाइनचे स्पोक दिसत आहेत.
या कारच्या इंटीरियरला डॅशबोर्डवर लाइट गोल्ड थीम मिळते. कारच्या पुढच्या सीटवर आर्म रेस्ट देण्यात आले आहेत. ज्यामुळे लांबचा प्रवास आरामदायी होतो.
सेफ्टीसाठी कंपनीने त्यात स्टॅंडर्ड मिनी ड्रायव्हर असिस्टंट फीचर दिले आहे. जे ड्रायव्हर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेते.
या कारला अॅक्टिव्ह गार्ड ड्रायव्हिंग असिस्टन्स फीचर देण्यात आले आहे. जे वेग जास्त असताना आपोआप ब्रेक लावते.
याशिवाय, यात एक लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टीम देखील आहे. जी महामार्गावर लेन बदलताच चालकाला सावध करते.
हायवे ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित करण्यासाठी, कॅमेरा-आधारित अॅक्टिव्ह क्रूझ कंट्रोल सिस्टीम देखील देण्यात आली आहे. जी आपोआप समोरून चालणाऱ्या वाहनापासून कारचे सुरक्षित अंतर तयार करते.