Hop Oxo Electric Bike आली, जबरदस्त रेंजसह किंमत आहे....
तेलंगणा राज्य सरकारद्वारे आयोजित हैदराबाद ई-मोटर शोमध्ये हॉप इलेक्ट्रिकने आपली हॉप ऑक्सो इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.60 लाख ते 1.80 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. हैदराबादमधील हिमायत नगर, उप्पल, करमनघाट, मलाकपेट, कोमपल्ली, कुकटपल्ली आणि मेडचल या 10 केंद्रावर ही बाईक विक्रीसाठी उपलब्ध आहे.
या बाईकच्या लॉन्चिंगवेळी होप इलेक्ट्रिकचे सह-संस्थापक निखिल भाटिया म्हणाले की, “आम्ही तेलंगणा सरकारला एका अद्भुत ई-मोबिलिटी सप्ताहासाठी अभिनंदन करू इच्छितो. मार्केटमध्ये गेम चेंजर ठरणाऱ्या Oxo ने हैदराबादच्या पहिल्या ई-रॅलीमध्ये भाग घेतला.
हॉप ऑक्सो इलेक्ट्रिक बाईक ट्वायलाइट ग्रे, कँडी रेड, मॅग्नेटिक ब्लू, इलेक्ट्रिक यलो आणि ट्रू ब्लॅक अशा 5 रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.
या बाईकची सर्व प्रो पॅकेज फीचर्स कंपनीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन आहेत.
Hop Oxo इलेक्ट्रिक बाईकमध्ये 3.75 kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी वापरण्यात आली आहे. जी BLDC हब मोटरला जोडलेली आहे. ही मोटर 5.2 kW/6.2 kW ची कमाल पॉवर आणि 185 Nm/200 Nm कमाल टॉर्क जनरेट करू शकते.
या बाईकचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. अंदाजे 135 किमी ते 150 किमीचा दावा केला आहे. 850W चा चार्जर वापरून ही बाईक 4 तासात 0 ते 80 टक्के चार्ज करता येते. यात इको, पॉवर, स्पोर्ट आणि रिव्हर्स 4 राइडिंग मोडसह FOC वेक्टर कंट्रोल देखील आहे.
Hop Oxo इलेक्ट्रिक बाईकमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5-इंचाचा स्मार्ट LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 4G LTE कनेक्टिव्हिटी आणि GNSS सह AGPS ने सुसज्ज आहे. मोबाइल अॅप कनेक्टिव्हिटीसाठी, ते ब्लूटूथ 5.0 आणि 128-बिट एन्क्रिप्शनसह एज टू क्लाउड सेफ्टीसाठी देण्यात आले आहे.