एक एप्रिलपासून BMW च्या गाड्या महगणार, कंपनीने घेतला निर्णय
एक एप्रिलपासून भारतात बीएमडब्ल्यू कारच्या किंमती महागणार आहेत. बीएमडब्ल्यू इंडियाने याची घोषणा केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीएमडब्ल्यू सर्व मॉडेलच्या कारच्या किंमती वाढणार आहे. किंमतीत 3.5 टक्के वाढण्याची शक्यता आहे.
कच्या मालाच्या आणि लॉजिस्टिक्सच्या किंमती, तसेच जागतिक तणाव, एक्सजेंच रेटमध्ये वाढ झाल्यामुळे बीएमडब्ल्यू इंडियाने आपल्या कारच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
बीएमडब्ल्यू 2 सीरीज ग्रॅन कूप, 3 सीरीज, 3 सीरीज ग्रॅन लिमोसिन, एम 340i, 5 सीरीज, 6 सीरीज ग्रॅन टूरिस्मो, 7 सीरीज, एक्स1, एक्स3, एक्स4, एक्स5, एक्स7 आणि मिनी कंट्रीमॅन यासारखे मॉडल विकत आहे.
बीएमडब्ल्यूआधी ऑडी, मर्सिडीज-बेंज यांनीही आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय जाहीर केलाय.
बीएमडब्लू इंडियाने मागील 12 महिन्यात तिसऱ्यांदा कारच्या किंमतीत वाढ केली आहे. मार्च 21 आणि ऑक्टोबर 2021 मध्ये किंमती वाढवल्या होत्या.
2021 मध्ये बीएमडब्लू कंपनीने भारतात 8,876 यूनिट्स विकले आहेत. गेल्या काही वर्षांत बीएमडब्लूच्या गाड्यांच्या विक्रीत 34 टक्के वाढ झाली आहे.