Colors Marathi Awards : ‘कलर्स मराठी अवार्ड्स 2022’ची धूम! पाहा कुणी कुणी मारली बाजी...

Colors Marathi,awards

1/10
नुकताच ‘कलर्स मराठी अवार्ड 2022’चा सोहळा पार पडला. यात कलर्स मराठीवरील प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांनी पुरस्कार पटकावत बाजी मारली आहे.
2/10
या पुरस्कारांच्या शर्यतीत ‘लोकप्रिय भावंडं’ हा पुरस्कार ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेतील ‘दुर्गा-शिवानी’ या बहिणींनी पटकावला आहे.
3/10
लोकप्रिय शीर्षकगीताचा पुरस्कार दोन मालिकांना विभागून देण्यात आला आहे. हा ‘जय जय स्वामी समर्थ’ आणि ‘तुझ्या रूपाचं चांदनं’ या मालिकांना मिळाला आहे.
4/10
तर, सर्वोत्कृष्ट सुत्रसंचालकाचा पुरस्कार ‘बिग बॉस मराठी 3’साठी महेश मांजरेकर यांना देण्यात आला आहे.
5/10
‘लोकप्रिय आजी’चा पुरस्कार ‘जीव माझा गुंतला’ फेम मल्हारच्या आजीला मिळाला आहे.
6/10
लोकप्रिय वडील ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील ‘चोळप्पा’ यांनी पटकावला.
7/10
लोकप्रिय सहाय्यक व्यक्तिरेखा (पुरुष) हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. ‘तुझ्या रूपाचं चांदनं’ फेम ‘शंकर’ आणि ‘आई , मायेचं कवच’ फेम ‘भास्कर’ यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
8/10
लोकप्रिय सहाय्यक व्यक्तिरेखा (स्त्री) हा पुरस्कार ‘राजा रानीची गं जोडी’मधील ‘बेबी मावशी’ला मिळाला आहे.
9/10
लोकप्रिय नकारात्मक पुरुष व्यक्तिरेखा हा पुरस्कार ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील दौलतला मिळाला आहे.
10/10
लोकप्रिय नकारात्मक स्त्री व्यक्तिरेखा ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील चित्राने पटकावला आहे.
Sponsored Links by Taboola