चिनी कंपनीने भारतात लॉन्च केली इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
देशात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता आता विदेशी कंपन्याही भारतात आपल्या इलेक्ट्रिक कार लॉन्च करत आहेत. अशातच आज चिनी वाहन निर्माता कंपनी BYD ने (Build Your Dream) आपली नवीन इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAtto 3 असं या नवीन इलेक्ट्रिक कारचे नाव आहे. भारतात लॉन्च होणारी ही कंपनीची दुसरी कार आहे.
याआधी कंपनीने भारतीय बाजारात आपली इलेक्ट्रिक MPV E6 सादर केली होती.
भारतात या कारची स्पर्धा MG ZS EV आणि Hyundai Kona EV शी होणार आहे.
Atto 3 या नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये ग्राहकांना 60.49kWh चा बॅटरी पॅक मिळणार आहे. या बॅटरी पॅकमध्ये ही कार 521 किमीची रेंज देईल, असा दावा कंपनीने केला आहे.
या कारमध्ये मॅग्नेटिक सिंक्रोनस इलेक्ट्रिक मोटर वापरण्यात आली आहे. ही मोटर 201bhp पॉवर आणि 310 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही कार फक्त 7.3 सेकंदात 0 ते 100 kmph चा वेग पकडू शकते.
या कारमध्ये कंपनीने अनेक फीचर्स दिले आहेत. यातच 5-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 12.8-इंच रोटेटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Android Auto आणि Apple CarPlay साठी सपोर्ट, 4-वे अॅडजस्टेबल फ्रंट पॅसेंजर सीट, ड्रायव्हर आणि फ्रंट पॅसेंजर हीटेड सीट, सीट बेल्ट रिमाइंडर सिस्टम, 6-वे सारखे फीचर्स यात ग्राहकांना मिळणार.
याशिवाय यात पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, हिल डिसेंट कंट्रोल, 6 एअरबॅग्ज, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, पीएम 2.5 एअर फिल्टर, सिंथेटिक लेदर सीट्स, वायरलेस फोन चार्जिंग, पॅनोरामिक सनरूफ, रिअर पार्किंग सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक, स्पीड अलर्ट सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशनसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, लेव्हल 2 ADAS सिस्टम, माउंटेड कंट्रोल्ससह फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग यासारखे फीचर्स ही यात देण्यात आलेले आहे.
कंपनीने अद्याप या कारची किंमत जाहीर केलेली नाही. कंपनी 2023 मध्ये ऑटो एक्स्पोमध्ये ही कार सादर करणार आहे. त्यावेळी याची किंमत जाहीर होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, भारतात स्वदेशी कार निर्माता कंपनीच्या इलेक्ट्रिक कार समोर ही कार टिकणार का हे पाहावं लागेल.