Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इथेनॉलवर धावणारी पहिली कार आली, नितीन गडकरी यांनी स्वतः चालून केली लॉन्च
गेल्या अनेक दिवसांपासून इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांची चर्चा होत होती. अखेर आज आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टोयोटाने देशातली पहिली फ्लेक्स इंधनवर धावणारी कार लॉन्च केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित ही कार लॉन्च करण्यात आली. या लॉन्चिंग कार्यक्रमात गडकरी यांनी स्वतःही ही कार चालवली.
या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादवही उपस्थित होते. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर या कारकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. ही गाडी आल्यानंतर आता लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ही कार भारतीय बाजारपेठेत आल्यानंतर लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे, कारण ही कार अतिशय स्वस्त आणि किफायतशीर असेल. तसेच पर्यावरणासाठीही ही कार फायदेशीर ठरेल.
टोयोटाने ही कार भारतात एक पायलट प्रोजेक्ट अंतर्गत फ्लेक्सी-इंधन स्ट्रॉंग हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन (FFV-SHEV) म्हणून लॉन्च केली आहे.
याआधी टोयोटाने Toyota Mirai ही पूर्णपणे हायड्रोजन इंधन सेलवर धावणारी कार भारतात लॉन्च केली होती. Toyota Corolla Altis बद्दल बोलायचे झाले तर, ही देशातील पहिली कार आहे जी पेट्रोल, इथेनॉल आणि इलेक्ट्रिकवर धावले. या कारमध्ये 1.8-लिटर पेट्रोल-हायब्रिड इंजिन देण्यात आले आहे.
जे 20 टक्के ते 100 टक्के इथेनॉल मिश्रणावर धावू शकते. हे फ्लेक्स इंजिन 75.3 kW पॉवर आणि 142 Nm पीक टॉर्क जनरेट करते.
कारचे इंजिन 1.3 kWh बॅटरी पॅकशी देखील जोडलेले आहे. जे 53.7 kW पॉवर आणि 162.8 Nm टॉर्क जनरेट करते.
याचे इंजिन CVT हायब्रिड ट्रान्सएक्सल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
फ्लेक्स-इंधन वाहने इथेनॉलवर धावतात. ऊस आणि मका सारख्या घटकांपासून इथेनॉल तयार केले जाते. यामुळेच पेट्रोल-डिझेल इतर देशांतून विकत घेण्यापेक्षा इथेनॉल हा एक चांगला पर्याय आहे. याशिवाय यामुळे देशातील शेतकऱ्यांना उसाला चांगला भाव मिळण्यास मदत होणार आहे. इथेनॉलकडे पर्यायी इंधन म्हणून पाहिले जात आहे. ज्याची किंमत 60-62 रुपये प्रति लीटर आहे. तर देशातील अनेक भागांमध्ये पेट्रोलची किंमत 106 रुपये प्रति लिटरपेक्षा जास्त आहे.