Bike care: बाईक धुताना 'या' गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर होऊ शकतं नुकसान; फॉलो करा या टिप्स

आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्या बाईक धुताना तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत. असे न केल्यास तुमच्या बाईकचे नुकसान होऊ शकते. बाईक धुण्यासाठी नेहमी मऊ कापडाचा वापरा करा. कारण कडक कापडामुळे बाईकच्या बॉडीवर स्क्रॅच पडू शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बाईक धुण्यासाठी नेहमी बाईक शॅम्पूचा वापर करा. हे तुमच्या बाईकची चमक टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते.

जेव्हा तुम्ही सर्फ किंवा इतर कोणत्याही हार्ड डिटर्जंटने मोटरसायकल धुता तेव्हा त्याचा तुमच्या बाईकच्या पेंटवर वाईट परिणाम होऊ शकतो.
जेव्हा तुम्ही बाईक धुता तेव्हा बाईकचा एक्झॉस्ट पाईप म्हणजे सायलेन्सरमध्ये पाणी भरणार नाही, याची काळजी घ्या. कारण जर त्यात पाणी शिरले तर बाईक सुरू करण्यास अडचण येऊ शकते.
अशा स्थितीत तुम्हाला पुन्हा-पुन्हा किक मारावी लागेल किंवा काही वेळ बाईक बंद करून ठेवावी लागले. या नंतर जेव्हा सायलेन्सरमधील पाणी स्वतःच सुकते तेव्हा बाईक सुरू होऊ शकते.
याशिवाय बाईकच्या की -लॉकमध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घ्या. कारण की-लॉकमध्ये पाणी भरल्यास बाईक चालू आणि बंद अडचण होऊ शकते.