PHOTO : अबब! एका चित्रपटासाठी तब्बल ‘इतकं’ मानधन आकारतात बॉलिवूड अभिनेत्री!
काळाबरोबर मनोरंजन विश्वातही बदल होताना दिसत आहेत. पूर्वी केवळ अभिनेत्यांना भरमसाठ फी मिळायची. मात्र, आता अभिनेत्रींनाही त्यांच्याबरोबरीने मोबदला मिळतो. दीपिका पदुकोणपासून ते प्रियांका चोप्रापर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्री आहेत, ज्या अभिनेत्यांपेक्षा अधिक मानधन आकारतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रियांका चोप्रा जोनास : बॉलिवूडच्या देसी गर्लचा आता परदेशातही दबदबा आहे. प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्येही सक्रिय झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्रियांका चोप्रा एका चित्रपटासाठी 15-25 कोटी रुपये मानधन घेते.
कंगना रनौत: बॉलिवूडची 'पंगा क्वीन' कंगना रनौतने तिच्या दमदार अभिनयासाठी चार राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. ‘थलायवी’ या चित्रपटासाठी कंगना रनौतने 27 कोटी रुपये घेतले होते.
दीपिका पदुकोण : ‘ओम शांती ओम’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री दीपिका पदुकोणची गणना टॉप कलाकारांमध्ये केली जाते. दीपिका लवकरच शाहरुख खानसोबत ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका एका चित्रपटासाठी 15-30 कोटी रुपये घेते.
कतरिना कैफ : कतरिना कैफ लवकरच ‘टायगर 3’मध्ये सलमान खानसोबत दिसणार आहे. कतरिना या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ एका चित्रपटासाठी 15-25 कोटी रुपये घेते.
करीना कपूर-खान : करीना कपूर-खानची गणना बॉलिवूडच्या बिग बजेट स्टार्समध्ये केली जाते. करीना एका चित्रपटासाठी 12 कोटी रुपये मानधन घेते.
आलिया भट्ट : आलिया भट्टने आपल्या सर्वोत्तम अभिनयाने फार कमी वेळात स्वत:साठी एक मोठे स्थान निर्माण केले आहे. सध्या ‘गंगूबाई काठियावाडी’मुळे चर्चेत असलेली आलिया एका चित्रपटासाठी जवळपास 23 कोटी रुपये मानधन घेते.
अनुष्का शर्मा : आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याच काळापासून सिनेसृष्टीपासून दूर असलेली अनुष्का शर्मा लवकरच ‘चकदा एक्सप्रेस’ या बायोपिकमध्ये दिसणार आहे. अनुष्का शर्मा एका चित्रपटासाठी 7 ते 10 कोटी रुपये मानधन घेते. (All Photos : Instagram)