Best Range Electric Scooters : 'या' इलेक्ट्रिक स्कूटर्समुळे पेट्रोल पंपावर वारंवार जाण्यापासून होईल सुटका; पाहा संपूर्ण लिस्ट
Best Range Electric Scooters : तुम्हालाही पेट्रोल पंपावर वारंवार जाऊन कंटाळा आला असेल तर आता तुम्ही या इलेक्ट्रिक स्कूटर्स वापरून पाहू शकता. या उत्तम रायडिंग रेंजही देतील.
Best Range Electric Scooters
1/5
या यादीतील पहिले नाव आहे सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर, जी एका चार्जवर 212 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे आणि 105 किमी/तास वेगाने प्रवास करू शकते. ही बाईक 1.45 लाख ते 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या किंमतीत विकत घेतली जाऊ शकते.
2/5
लेटेस्ट फिचर्ससह अपडेट असलेल्या Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटरचाही या यादीत समावेश आहे. या स्कूटरने एका चार्जवर 146 किमीपर्यंतचे अंतर कापले जाऊ शकते. ही बाईक विकत करण्यासाठी, तुम्हाला 1.28 लाख रुपयांपर्यंत खर्च येईल.
3/5
तिसरी स्कूटर TVS iQube आहे, जी एका चार्जवर 145 किमी पर्यंतचे अंतर कापण्यास सक्षम आहे. ही बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1.22 लाख ते 1.38 लाख रुपये खर्च करावे लागतील.
4/5
या यादीतील पुढचा क्रमांक Ola S1 आणि Ola S1 Proचा आहे, जी देशातील सर्वाधिक पसंतीची इलेक्ट्रिक स्कूटर आहे. Ola S1 ची राइडिंग रेंज 141 किमी आहे आणि Ola S1 Pro ची राइडिंग रेंज 181 किमी आहे आणि त्याची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे 1.30 लाख आणि 1.40 लाख रुपये आहे.
5/5
पाचव्या क्रमांकावर Hero Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी एका चार्जवर 165 किमी पर्यंतचे अंतर कापण्यास सक्षम आहे. 1.26 लाख रुपयांपर्यंतच्या एक्स-शोरूम किमतीत तुम्ही ही बाईक विकत घेऊ शकता.
Published at : 07 Aug 2023 09:56 AM (IST)