Lohgad : ऊन-पावसाचा लपंडाव अन् धुक्याची साथ....डोळ्याचं पारणं फेडणारा निसर्ग
नाजिम मुल्ला, एबीपी माझा
Updated at:
07 Aug 2023 08:34 AM (IST)
1
सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील निसर्ग चांगलाच बहरला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अशातच श्रावणातील ऊन-पावसाचा लपंडाव अन् यात धुक्याची मिळणारी साथ हा खेळ अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडत आहे.
3
लोणावळा लगतच्या लोहगडावरुन हाच निसर्ग मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यात आला आहे.
4
हाच निसर्ग डोळ्यात टिपण्यासाठीच पर्यटकांची या परिसरात वर्षाविहाराला पसंती असते.
5
लोणावळा आणि मावळ परिसरामध्ये घाटमाथ्यावर पावसामुळे लोणावळ्याचं निसर्ग सौंदर्य खुललं आहे.
6
लोहगड हे लोणावळ्यातील प्रसिद्ध पर्यटन ठिकाण. वीकेण्डला पुणे, मुंबईच्या पर्यटक इथे हजेरी लावतात.
7
पावसात लोहगड किल्ला पर्यटकांना खुणावत असतो. सध्या इथे धुक्याची चादर पाहायला मिळत आहे.
8
लोहगड किल्ला हा पुण्यातील मावळ तालुक्यात आहे.