Auto Expo 2023: ऑटो एक्सपोमध्ये दिसली Kia च्या MPV कार कार्निवलची पहिली झलक; पाहा फोटो
Auto Expo 2023 India: वाहन निर्मात्या Kia नं अखेर आपली नवी MPV कार, Kia Carnival सादर केली. Kia चे हे नवं मॉडेल भारतात प्रथमच सादर करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्याची Kia कार्निव्हल गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. म्हणूनच, नव्या पिढीचं मॉडेल बरंच मोठं आणि अनेक नव्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज केलं गेलं आहे.
डिझाईनच्या बाबतीत नवा कार्निव्हलचा लूक आधीच्या कार्निव्हलपेक्षा अधिक बोल्ड आहे. तसेच, नवीन एमपीव्ही अधिक आकर्षक दिसतेय
MPV कॅप्टन सीट्स आणि मल्टिपल सीटिंग कॉन्फिर्गेशनसह आतील बाजूला मोठी जागा आहे. केबिनला अधिक आरामदायी बनवण्यासाठी 3-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम देखील आहे.
किया कारच्या केबिन फिचर्समध्ये डॅशबोर्डवरील दोन 12.3-इंच स्क्रीन आणि एक रोटरी ड्राइव्हचा समावेश आहे. तसेच, ही कार आधीच्या कारपेक्षा खूपच आलिशान आहे.
सरकते दरवाजे हे नव्या कार्निव्हलचं वैशिष्ट्य आहे. यासोबतच यामध्ये ADAS संरक्षणही देण्यात आलं आहे.
नव्या पिढीची कार्निव्हल स्वयंचलित गिअरबॉक्सशी जोडण्यात आली आहे. ही डिझेल इंजिनसह सुरू राहील.
परदेशात लॉन्च करण्यात आलेल्या कार्निव्हलमध्ये मोठं पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे.