Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Photo : सातपुड्याच्या कुशीत फुलला स्ट्रॉबेरीचा मळा
नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं सातपुड्याच्या कुशीत उत्तम प्रकारची स्ट्रॉबेरीची शेती (Strawberry Cultivation) फुलवली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधिरसिंग फुसा पाडवी (Dhir Singh Phusa Padavi) असं शेतकऱ्याचे नाव आहे. अवघ्या तीन महिन्याच्या हंगामात एक एकर स्ट्रॉबेरी शेतीतून पाडवी यांनी लाखो रुपयांचं उत्पादन घेतलं आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगात वसलेल्या डाब या गावातील एका शेतकऱ्यांने स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करून दाखवली आहे.
शेतकरी धिरसिंग फुसा पाडवी यांचं कोणतेही शिक्षण झालं नसताना त्यांनी स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती केली आहे. ते बालपणापासून कोणत्याच शाळेत शिकलेले नाहीत. पण त्यांनी जे प्रयोग आपल्या शेतीत केले ते उच्चशिक्षितांना जमणार नाहीत
एक एकर स्ट्रॉबेरी शेतीतून 6 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. मागील वर्षी देखील स्ट्रॉबेरीच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळाले होते. यावर्षी देखील चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा
2021 साली त्यांनी एका एकरात 12 हजार स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केली. यासाठी त्यांनी 1 लाख 55 हजार एवढा लागवड खर्च आला. यातून 3 टन उत्पन्न मिळाले. त्यात धिरसिंग फुसा पाडवी यांना 4 लाख 50 हजार रुपयांचा नफा मिळाला.
योग्य नियोजन आणि परिश्रमाच्या जोरावर धिरसिंग यांनी स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी केली आहे. पाण्याचे योग्य नियोजन करून हा प्रयोग यशस्वी झाला आहे. येथील स्ट्रॉबेरी नंदूरबार जिल्ह्यासह शेजारील गुजरात राज्यात जात आहे. मालाचा दर्जा चांगला असल्यानं आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.
सद्या स्ट्रॉबेरीची तोडणी सुरू असून जवळपास 6 लाख रुपये उत्पन्न मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
सातपुड्याच्या डोंगररांगात वसलेल्या डाब या गावातील एका शेतकऱ्यांने स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करून दाखवली आहे. शेतकरी धिरसिंग फुसा पाडवी यांचं कोणतेही शिक्षण झालं नसताना त्यांनी स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती केली आहे.
धिरसिंग फुसा पाडवी यांनी अवघ्या तीन महिन्याच्या हंगामात एक एकर स्ट्रॉबेरी शेतीतून पाडवी यांनी लाखो रुपयांचं उत्पादन घेतलं आहे.