Affordable 6-Seater Cars: कमी किंमतीत चांगली फॅमिली कार खरेदी करायचा विचार करताय? तर 'हे' 5 उत्तम पर्याय पाहाच
मोठ्या गाड्यांमध्ये सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागा असते, सोबत लेग रूम आणि हेड रूम असते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला 6 किंवा 7 सीटरची मोठी गाडी घ्यायची असेल, तर आज काही उत्तम पर्यायांबद्दल जाणून घ्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमारुती सुझुकी एर्टिगा (Maruti Suzuki Ertiga) : मारुतीची ही गाडी भारतातील सर्वात मोठी 7-सीटर MPV आहे. मोठ्या कुटुंबासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. त्यात 7 लोक आरामात बसू शकतात.
मारुती सुझुकी एर्टिगामध्ये पेट्रोल आणि CNG दोन्हीचा पर्याय उपलब्ध आहे. ज्यामध्ये मायलेज अनुक्रमे 20.51 kmpl आणि 26.11 kmpl आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 8.64 लाख रुपये आहे.
महिंद्रा बोलेरो निओ (Mahindra Bolero Neo) : ही गाडी कंपनीच्या TUV300 चं रिबॅज केलेलं मॉडेल आहे. या गाडीत 7 लोक आरामात बसू शकतात.
महिंद्रा बोलेरो निओ या गाडीत शक्तिशाली इंधन कार्यक्षम इंजिन आहे. या कारची किंमत 9.64 लाख ते 12.15 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.
टोयोटा रूमियन (Toyota Rumion) : टोयोटाची ही कार मारुती सुझुकी एर्टिगावर आधारित आहे. त्याचे लूक आणि फीचर्स जवळपास Ertiga सारखेच आहेत.
किया कारन्स (Kia Carens) : किया कंपनीची 6 सीटर कार एक उत्तम फॅमिली कार पर्याय आहे आणि बाजारात मोठ्या प्रमाणावर ही गाडी विकली जात आहे, जी आकाराने बरीच मोठी आहे.
टोयोटा रूमियनमध्ये पेट्रोल आणि सीएनजीचाही पर्याय आहे. यात 7 जण बसू शकतील एवढी जागा आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 10.29 लाख रुपये आहे.
किया कारन्स या गाडीत जास्त जागा उपलब्ध आहे, यात पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनचा पर्याय आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 10.45 लाख रुपये आहे.
रेनॉल्ट ट्रायबर (Renault Triber) : ही भारतातील सर्वात स्वस्त MPV आहे, त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत फक्त 6.33 लाख रुपये आहे.
रेनॉल्ट ट्रायबर या गाडीत पेट्रोल-इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. ही कार मोठी असण्यासोबतच ती चांगलं मायलेज देखील देते.