7 Seater Cars in Budget : 'या' आहेत 7 सीटर कार ज्या तुम्ही 5 सीटरच्या किमतीत खरेदी करू शकता; पाहा संपूर्ण लिस्ट
तुमचे बजेट 5 सीटर कारचे असेल आणि तुम्हाला 7 सीटर कार घ्यायची असेल तर तुम्ही या पर्यायांचा विचार करू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया यादीत किआच्या आलिशान कार Kia Carens चं पहिलं नाव आहे. कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.45 लाख रुपये आहे. ही कार दोन व्हेरिएंटमध्ये (डिझेल आणि पेट्रोल) उपलब्ध आहे.
या यादीत दुसरे नाव नुकतेच लाँच झालेल्या टोयोटा रुमिओनचे आहे. ही कार मारुती सुझुकी एर्टिगाची रिबॅज केलेलं व्हर्जन आहे. ही कार 10.29 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केली जाऊ शकते. ही 7 सीटर कार पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
ही कार टोयोटा रुमिओन आणि मारुती सुझुकी एर्टिगाचं मूळ व्हर्जन आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8.64 लाख रुपये आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही व्हेरिएंटमध्ये देखील खरेदी केले जाऊ शकते.
महिंद्रा बोलेरो निओ हीसुद्धा कार तुमच्यासाठी फार उपयुक्त ठरणारी आहे. ही कार बोलेरोचे अपडेटेड व्हर्जन आहे. कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9.63 लाख रुपये आहे. ही कार फक्त डिझेल व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.
देशांतर्गत बाजारपेठेतील सर्वात परवडणारी कार, रेनॉल्ट ट्रायबर आहे. या कारची किंमत 6.34 लाख रुपयांपासून सुरू होते. यामध्ये 999 सीसी इंजिन आहे आणि क्रॅश चाचणीमध्ये त्याचे सुरक्षा रेटिंग 4 स्टार आहे. ही कार फक्त पेट्रोलवर आधारित आहे.