Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Latur : छावा संघटनेनं अडवला मंत्री संजय बनसोडेंचा ताफा, मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी लातूर जिल्ह्यात छावा संघटना (Chhava Sanghatna) आक्रमक झाली आहे. दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीनं मंत्री संजय बनसोडेंच्या (Minister Sanjay Bansode) घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील अनेक भागात पावसानं (Rain) दडी मारली आहे, त्यामुळं दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
मंत्री संजय बनसोडे हे ध्वजारोहणासाठी घरातून बाहेर निघाले होते. त्याच वेळेस छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर येऊन आंदोलन करत त्यांची गाडी अडवली.
सरकारनं यावर गांभीर्याने विचार करत तात्काळ दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी छावा संघटनेनं केली आहे
यावेळी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
संजय बनसोडे यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधत त्यांचे निवेदन स्वीकारलं.
छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यातील दुष्काळाबाबत कोणताही निधी देण्यात आला नाही. त्यामुळं छावा संघटना आक्रमक
विरोधी पक्षांकडून देखील राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. राज्यात पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे.
मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी छावा संघटना आक्रमक झाली आहे.