India's Safest Car: 'या' आहेत भारतातील सर्वाधिक सुरक्षित पाच कार
ग्लोबल एनसीएपी (Global NCAP)चाचणीमध्ये या कारला पाच पैकी पाच रेटिंग स्टार मिळाले आहेत. ग्लोबल एनसीएपी (Global NCAP)कडून सुरक्षितेच्या दृष्टीने होणारी कारची चाचणी ही जागतिक पातळीवर विश्वासार्ह समजली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTata Nexon (Rating- 5/5) : टाटा नेक्सॉनच्या कारला सुरक्षितेसाठी 5 स्टार रेटिंग मिळाली आहे. पूर्ण 5 स्टार रेटिंग मिळणारी ही पहिलीच मेड इन इंडिया कार आहे. टाटा नेक्सॉनची किंमत 7.30 लाखांपासून सुरू होते.
Mahindra XUV300 (Rating- 5/5) : महिंद्रा XUV300 ला ग्लोबल NCAP द्वारे प्रौढ व्यक्तींसाठी 5 स्टार आणि लहान मुलांच्या संरक्षणासाठी 4 स्टार रेटिंग मिळाले आहे. या कारची किंमत 7,95,963 रुपयांपासून सुरू होते.
Tata Altroz (Rating- 5/5) : प्रीमियम हॅचबॅक Tata Altroz ला 5-स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आली आहे. या कारची किंमत 5.90 लाखांपासून सुरू होते.
Mahindra XUV700 (Rating- 5/5) : महिंद्राची XUV700 नुकतीच लॉन्च करण्यात आली आहे. ही भारतातील सर्वात सुरक्षित कार म्हणून समजली जाते. 5 स्टार रेटिंग मिळवणारी ही एकमेक थ्री-रो एसयुव्ही कार आहे. या एसयूव्ही कारची किंमत 12.49 लाखांपासून सुरू होते.