26.6 किमी मायलेज, हायब्रिड तंत्रज्ञान; नवीन Toyota Urban Cruiser Hyryder सीएनजी लॉन्च; पाहा फोटो
प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी Toyota ने Urban Cruiser Hyryder चे CNG व्हेरिएंट भारतात लॉन्च केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकंपनीने अर्बन क्रूझर हायरायडरचे सीएनजी व्हेरिएंट S आणि G प्रकारांमध्ये सादर केलं आहे.
ज्याची किंमत अनुक्रमे 13.23 लाख आणि रुपये 15.29 लाख (एक्स-शोरूम) आहे.
कंपनी आपल्या सीएनजी वाहनांमध्ये फॅक्टरी फिट सीएनजी किट देत आहे.
कंपनीने आपल्या वेबसाइट आणि डीलरशिपद्वारे सीएनजी मॉडेल्सची बुकिंग सुरू केली आहे. याच कारबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडरचे सीएनजी व्हेरिएंट 1.5-लिटर के-सीरिजमध्ये आणले जात आहे.
इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. CNG इंजिनमध्ये अर्बन क्रूझर हायरायडर 26.6 किमी/किलो मायलेज देईल.
आपेट्रोल व्हेरिएंटमध्ये Highrider ची स्ट्रॉंग हायब्रिड व्हर्जन 28 किमी/ली मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे.
टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर पॅनोरामिक सनरूफ, हवेशीर फ्रंट सीट्स, वायरलेस चार्जिंग, हेड-अप डिस्प्ले, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, टोयोटा आय-कनेक्ट तंत्रज्ञान, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, सहा एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा आणि TPMS ने सुसज्ज आहे. यात कनेक्टेड कार तंत्रज्ञान देखील आहे, जे ग्राहकांना त्यांचे स्मार्ट वाॅच आणि विशिष्ट उपकरणे कनेक्ट करण्यास सपोर्ट करतात.
इतर प्रमुख फीचर्समध्ये 17-इंच अलॉय व्हील, ड्युअल-टोन इंटिरियर्स, मागील एसी व्हेंट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग, ऑटोमॅटिक एसी, हाईट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, रिक्लाइनिंग रिअर सीट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि बरेच काही समाविष्ट आहे.