Photo: छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाईला सुरुवात, सावंगी चौकातील बांधकाम हटवलं

Chhatrapati Sambhaji Nagar : लासूर स्टेशन भागातील सावंगी चौकात गेल्या अनेक वर्षात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Encroachment | Aurangabad News

1/8
लासूर स्टेशन परिसरातील सावंगी चौकात अतिक्रमण वाढले आहे.
2/8
गेल्या अनेक वर्षांपासून येथील अतिक्रमण काढून घेण्याची मागणी केली जात आहे.
3/8
त्यामुळे अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढण्याबाबत अतिक्रमणधारकांना नोटीसा दिल्या होत्या.
4/8
त्यानुसार आजपासून अतिक्रमण काढायला सुरुवात झाली आहे.
5/8
यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
6/8
विशेष म्हणजे अनेक अतिक्रमण करणाऱ्यांनी स्वतः काही प्रमाणात अतिक्रमण हटवलं आहे.
7/8
घटनास्थळी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यास तेथे पोलिसांची एक तुकडी देखील तैनात करण्यात आली आहे.
8/8
यावेळी जेसीबीच्या मदतीने रस्त्यावरील अतिक्रमण काढले जात आहे.
Sponsored Links by Taboola