Verul Ajantha Festival : दिमाखदार सोहळ्यात वेरूळ-अजिंठा महोत्सवास सुरुवात
महाराष्ट्र पर्यटन संचालनालय व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतालबद्ध पदन्यास आणि शास्त्रीय सुरावटीत महोत्सवाला शनिवारी सायंकाळी दिमाखात सुरुवात झाली.
सुवर्णझळाळी लाभलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरातील सोनेरी महालाच्या प्रांगणात महोत्सवाचा पहिला दिवस गाजला.
वेरूळ- अजिंठा महोत्सवाच्या निमित्ताने शनिवारी शास्त्रीय नृत्य व लोकनृत्याचे लक्षवेधी सादरीकरण एकत्रित पाहण्याची संधी रसिकांना मिळाली.
‘त्रिपर्णी’तून मयूर वैद्य आणि मृण्मयी देशपांडे यांचे कथक, प्रार्थना बेहरे यांचे भरतनाट्यम आणि भार्गवी चिरमुले यांच्या लावणीने रसिकांना खिळवून ठेवले.
नृत्यशैली भिन्न असली तरी त्यांचा शास्त्रीय पाया एक असल्याचे कलाकारांनी नृत्याविष्कारातून दाखविले.
दुसऱ्या सत्रात पं. राशीद खान यांचे शास्त्रीय गायन रंगले.
यावेळी आवाजातील हुकूमतीने खान यांनी मैफल गाजविली.
त्यानंतर गायक महेश काळे यांच्या गायनाने मैफलीत अधिक रंग भरले.
विजय घाटे आणि पं. राकेश चौरसिया यांच्या तबला व बासरीच्या जुगलबंदीने पहिल्या दिवसाची सांगता करण्यात आली.