G-20: छत्रपती संभाजीनगर शहरात विदेशी पाहुण्यांचे आगमनास सुरुवात,पाहा फोटो

औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर जी-20 च्या पार्श्वभूमीवर विदेशी पाहुणे दाखल होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
त्यात महिला-20 परिषदेच्या अध्यक्षा संध्या पुरेचा, पंतप्रधान कार्यालयातील आर्थिक सल्लागार डॉ. शमिका रवी यांच्यासह युरोपीयन संघ, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, तुर्की आदी देशांतील महिला प्रतिनिधी शहरात दाखल झाल्या आहेत.

विमानतळावर उतरताच विदेशी पाहुण्यांना पाणी आणि कोल्ड्रिंक्स देण्यात आले.
त्यानंतर पाहुणे विमानतळाबाहेर येताच त्यांचे औक्षण करण्यात आले.
विदेशी पाहुण्यांचे पुष्पहार घालून जोगदार स्वागत करण्यात आले.
तसेच पाहुण्यांच्या गळ्यात शाल घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.
यावेळी महापालिकेच्या शाळेतील नऊवारी साडीतील मुलींनी लेझीमचे सुंदर सादरीकरण केले.
काही पाहुण्यांनी मुलींकडून लेझीम हातात घेत क्षणभर ठेकाही धरला.
हे सर्व सुंदर चित्र आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह विदेशी पाहुण्यांना रोखता आला नाही.