PHOTO: कुणाचं मंगळसूत्र तर कुणाची दुचाकी, औरंगाबादमध्ये ‘लाखमोला’चा मुद्देमाल परत मिळताच फुलले चेहरे
औरंगाबाद पोलिसांनी गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद शहर परिमंडळ -1 अंर्तगत विविध पोस्टे च्या गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत केला.
यावेळी क्रांतीचौक पोलीस ठाणे, वेदांतनगर, वाळुज, एम.आय.डी.सी. वाळुज, बेगमपुरा, छावणी पोलीस ठाणे अंतर्गत फिर्यादीचा चोरीस गेलेला मुद्देमाल परत करण्यात आला.
यावेळी एकूण 19 लाख 5 हजारांचा मुद्देमाल फिर्यादीला परत देण्यात आला.
ज्यात सोन्याचा एक मंगळसूत्र परत करण्यात आला.
याचवेळी एका फिर्यादीची रोख रक्कम त्याला परत देण्यात आली.
एकाचा चोरीला गेलेला लॅपटॉप त्याला परत देण्यात आला.
एका व्यक्तीला त्याचा चोरी गेलेला आयशर ट्रक परत करण्यात आला.
तसेच एकूण 25 जणांना गुन्ह्यातील मोटारसायकल परत देण्यात आल्या.
दोघांना त्यांच्या चोरीला गेलेल्या सायकल परत देण्यात आल्या आहेत.
तसेच पाच जणांना गुन्ह्यातील पाच मोबाईल त्यांना परत देण्यात आल्या आहेत.