PHOTO: मराठवाड्यातील काळ्या द्राक्षांना मिळतोय विक्रमी दर
कारण कधी नव्हे तो एवढा विक्रमी दर सद्या द्राक्षाच्या बागाला (Grape Orchard) मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठवाड्यातील निवडक भागात द्राक्षाची लागवड होते.
मात्र नाशिकच्या द्राक्षाला बाजारात यायला आणखी काही दिवस शिल्लक असल्याने व्यापाऱ्यांनी मराठवाड्याच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडे मोर्चा वळवलाय.
त्यामुळे चांगल्या दर्जामुळे काळ्या द्राक्षाला (Black Grape) 121 ते 130 रुपये प्रति किलो तर साधारण द्राक्षाला 70 ते 80 रुपये भाव मिळतोय.
औरंगाबाद जिल्ह्यातील सटाना, पळशी परिसरांतही द्राक्ष बागां पाहायला मिळतात.
तर जालन्यातील कडवंची, नंदापूर, धारकल्याण, पिरकल्यान, वरूड, वरूडी, बोरखेडी, आदी शिवारात देखील मोठ्याप्रमाणावर द्राक्षांच्या बागा आहेत.
नाशिक येथील द्राक्ष बाजारात येण्यासाठी आणखी 25 दिवसांचा कालावधी आहे.
पण मराठवाड्यातील द्राक्ष बागांमध्ये काढणी सुरु झाली असल्याने, चांगले दर मिळत आहे.