PHOTO: सोयाबीन बाजारात येण्यापूर्वीच दरामध्ये घसरण, शेतकऱ्यांना फटका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Oct 2022 11:49 AM (IST)

1
दिवाळीचे बोनस पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनच्या हंगामाला जेमतेम आठ ते पंधरा दिवसांचा कालावधी राहिला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
असे असताना बाजारपेठेमध्ये सोयाबीनच्या दरात एक हजार रुपयांची घसरण झाली आहे.

3
पेरणी हंगामा काळात सोयाबीनचा दर 3 हजार 500 ते 5 हजार रुपयांपर्यंत होता.
4
शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपत आले, तेव्हा सोयाबीनचे दर 7 हजार 590 पर्यंत वाढले होते.
5
या हंगामात सोयाबीनला सर्वात उच्चांकी दर मिळाला होता.
6
मात्र दोन महिन्यांपासून सोयाबीनचे दर सहा हजारांदरम्यान स्थिरावले होते.
7
आता बाजारात शेतकऱ्यांचे सोयाबीन येणार असतानाच या दरामध्ये एक हजारांनी घसरण झाली आहे.
8
त्यामुळे याचा फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.