PHOTO: भर पावसाळ्यात पाण्यासाठी हंडा मोर्चा, ग्रामपंचायतला ठोकले टाळे
पैठण तालुक्यातील आडूळ गावात नागरिकांना करावा लागतोय पाणी टंचाईचा सामना.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगावकऱ्यांना भर पावसाळ्यात देखील पिण्यासाठी पाणी मिळेना.
गेल्या तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने गावकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळतोय.
पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांसह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.
हंडा मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.
गावात ड्रेनेज लाईनचे काम केल्याने पूर्वीची नळाची पाईपलाईन फुटून नादुरुस्त झाली आहे.
नवीन पाईपलाईनची जोडणी रखडल्याने गावातील काही भागात मागील तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा झालेला नाही.
त्यामुळे संतत्प गावकऱ्यांनी हंडा मोर्चा काढत ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.
लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे ग्रामपंचायत प्रशासनाने आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.