औरंगाबादच्या सिटी बससेवेला चार वर्षे पूर्ण; महिलांना मिळणार महत्वाच 'गिफ्ट'
मोसीन शेख
Updated at:
22 Jan 2023 03:01 PM (IST)
1
या निमित्ताने बससेवेचा चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सोमवारी सकाळी 9 वाजता मुकुंदवाडी बसडेपो येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
3
दरम्यान यावेळी महिलांसाठी विशेष बस (Women Special Bus) सेवा सुरू करण्याची घोषणा केली जाणार आहे.
4
तर गेल्या चार वर्षात आतापर्यंत दीड कोटी नागरिकांनी शहर बसमधून प्रवास केला आहे.
5
सध्या 80 बस शहरातील विविध मार्गांवर धावत आहेत.
6
या काळात 150 बस स्थानक, ई-तिकीट स्मार्ट कार्ड व अन्य सेवेचाही लाभ नागरिकांना मिळत आहे.
7
शहर बससेवेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून जाधववाडी परिसरात नवीन बसडेपो बांधण्यात येत आहे.
8
तसेच सिटी बस सेवेच्या पाचव्या वर्षी औरंगाबाद स्मार्ट सिटीतर्फे 35 इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात येणार आहे.