PHOTO: धरणात उडी घेतलेल्या 'त्या' शिवसैनिकाला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा लागली कामाला
औरंगाबादच्या वैजापूर शहरातील नारंगी मध्यम प्रकल्पात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मुंबईतील दसरा मेळाव्यातून परत येणाऱ्या एकाने उडी मारली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिनेश माधवराव सोनवणे ( वय 50, रा. साजेगाव, जि. यवतमाळ) असे शिवसैनिकाचे नाव आहे.
दिनेश गावातील मित्रांसोबत शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी बसने मुंबईला गेला होता.
परतीच्या प्रवासात गुरुवारी बस यवतमाळकडे जात असताना, चहा घेण्यासाठी चालकाने बस वैजापूरला थांबवली.
त्याचवेळी दिनेशने बसमधून पळ काढून सायंकाळी सातच्या सुमारास नारंगी मध्यम प्रकल्पात उडी मारली.
दिनेश हा मंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील असल्याने त्याला वाचविण्यासाठी स्थानिक प्रशासनाला मंत्रालयातूनही फोन खणखणत होते.
त्यामुळे पोलिसांननी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले,पण रात्र झाल्याने ते थांबवण्यात आले.
दुसऱ्या दिवशी पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले.
तब्बल 24 तासांनंतर पोलिस व अग्निशमन दलास या शिवसैनिकाला शोधण्यात यश आले.
पोलिसांना तो राजपूत वस्तीजवळ सुरक्षितरीत्या धरणाच्या कडेला चिखलात सापडला.