PHOTO: जायकवाडी धरणाचे पुन्हा 18 दरवाजे उघडले
धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजायकवाडी धरणाचे 10 ते 27 क्रमांकाचे 18 दरवाजे उघडण्यात आली आहे.
सद्या जायकवाडी धरणातून 18 हजार 864 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
तर जायकवाडी धरणातून 2 हजार 580 हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे.
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 99.67 टक्के असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.
जायकवाडी धरणात पाण्याचा जिवंत साठा 2163.771 दलघमी आहे.
जायकवाडी धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये 463.887 तर फुटमध्ये 1521.94 एवढी आहे.
यावर्षी जायकवाडी धरणात एकूण 211 टीएमसी पाण्याची आवक झाली असून, आतापर्यंत त्यातून 156 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
25 जुलै ते 03 ऑगस्ट या 9 दिवसांत धरणातून 10.41 टीएमसी पाणी सोडण्यात आले.
त्यानंतर पुन्हा एकदा 08 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या 19 दिवसांत 41.30 टीएमसी पाणी सोडण्यात आले.
त्यानंतर 27 ऑगस्ट ते 04 ऑक्टोबर या 38 दिवसांत 148 टीएमसी पाणी जायकवाडी धरणातून सोडण्यात आले.