PHOTO: जिल्हा समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे वेतन थांबले, डॉक्टरांकडून काम बंदचा इशारा
मात्र गेल्या काही महिन्यांपासून समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे वेतन थकले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे मूळ वेतन 25 हजार गेल्या दोन महिन्यापासून थकले आहे.
समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे वेतनासह PBI चे 15 हजार रुपये 6 ते 8 महिन्यांपासून मिळाले नाही.
वारंवार कल्पना देवुनही PBI न मिळाल्याने डॉक्टरांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे.
मासिक वेतनही दरवेळी 1 ते 2 महिने उशिरा मिळत आहे.
जिल्हा समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद जिल्हा परिषद सीईओंची भेट घेत याबाबत निवेदन दिले.
यावेळी PBI व थकित 2 महिन्यांचे वेतन तात्काळ जमा करण्याची मागणी केली.
तसेच मासिक वेतन हे नियमित प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या आत जमा करण्याची मागणी केली.
मागण्या मान्य न झाल्यास राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय कामबंद आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेकडून देण्यात आला.