Photo : पिवळं सोनं बहरलं, पहिला बार दसऱ्याला निघणार
मोसीन शेख
Updated at:
22 Sep 2022 02:04 PM (IST)
1
फुलाची शेती गुंठ्यामध्ये करता येत असल्याने अल्पभूधारक शेतकरी मोठ्या प्रमाणात याकडे वळतायत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील फेंडफळ, संवदगाव, बोरसर, खंडाळा, चोर वाघलगाव, वैजापुरसह ग्रामीण भागात फुल शेती केली जातेय.
3
अनेक गावांत झेंडूच्या फुलांची शेती करण्याचा लळा शेतकऱ्यांना लागला आहे.
4
शेतकऱ्यांना खर्च वजा जाता 50 ते 60 हजाराचा निव्वळ नफा मिळत आहे.
5
झेंडूची लागवड ही साधारण जुलै महिन्यात करण्यात येते.
6
जुलै महिन्यात लागवड केल्यानंतर याचा पहिला बार हा दसऱ्याला येतो, तर दुसरा बार दिवाळीत निघतो.
7
वैजापूरसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी आता पिवळं सोनं बहरल्याचं पाहायला मिळत आहे.
8
या झेंडूच्या फुलांना शिर्डी,नाशिक, औरंगाबाद, मुंबई आदी शहरात मोठ्या प्रमाणात चढा भाव मिळतोय.