PHOTO: शरद पवार आणि रावसाहेब दानवे यांचा एकाच गाडीतून प्रवास
शिवसेनेच्या दोन्ही गटातील संघर्षामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशातच आज राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे या दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचे पाहायला मिळालं.
दोन्ही नेते एकाच गाडीतून गेल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
औरंगाबादमध्ये ज्या हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार थांबले आहेत, त्याच हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सुध्दा दाखल झाले होते.
त्यानंतर दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला आहे.
शरद पवार आणि रावसाहेब दानवे हे औरंगाबादहून गेवराईच्या दिशेने गेले आहेत.
गेवराईत आज माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे.
या कार्यक्रमात शरद पवार आणि रावसाहेब दानवे हे दोन्ही नेते हजेरी लावणार आहेत.