PHOTO: रेड्याच्या वाढदिवसाला शहरभर होर्डिंग, 700 पाहुण्यांना जेवणाचे आमंत्रण
एखाद्या नेत्याला किंवा सेलिब्रिटीला लाजवेल असा रेड्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसूरज असे या रेड्याचे नाव असून, या रेड्याच्या वाढदिवसाला शहरभर होर्डिंग लावत तब्बल 700 पाहुण्यांना जेवणाचे आमंत्रण देण्यात आले होते.
औरंगाबादचे शंकरलाल पहाडिया यांच्याकडे असलेला नागपूर हेटी प्रजातीचा सुरज रेडा यंदा दोन वर्षांचा झाला आहे.
आपल्या मुलाप्रमाणे पहाडिया यांनी सूरजचा सांभाळ केला आहे.
सूरजचा दुसरा वाढदिवस अविस्मरणीय पद्धतीने साजरा होणार असल्याने शहरात त्याच्या वाढदिवसाचे आठ ते दहा दिवसांपूर्वी होल्डिंग लावण्यात आले होते.
वाढदिवसासाठी थेट नांदेड व जालन्यातून 50 पाहुणे आले होते.
आलेल्या पाहुण्यांसाठी जेवणात व्हेज पुलाव, बिर्याणी कचुंबर तयार करण्यात आला होता.
त्यामुळे या हटके वाढदिवसाची जिल्ह्याभरात चर्चा पाहायला मिळत आहे.
पहाडिया हे सुरजवर महीन्याला 12 हजार रुपये खर्च करतात.