PHOTO: औरंगाबादेत फुलतायात 'ड्रॅगन'चे मळे, आतापर्यंत सव्वाशे एकरावर लागवड
औरंगाबाद जिल्ह्यातील 32 शेतकऱ्यांनी जवळपास 125 एकरांवर ड्रॅगन फ्रूटची बाग फुलवली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिल्ह्यात ड्रॅगन फ्रूटची बहुतांश शेती ब्रह्मगव्हाण शिवारात आहे.
ड्रॅगन फ्रूटला पाणी कमी लागत असल्याने पाण्याची खूप आवश्यकता नाही.
यासाठी सिमेंटचे साडेसात फुटांचे चार इंच बाय चार इंच मजबूत खांब लागते.
अडीच फुटांच्या रुंद सरीत 10 बाय 10 फुटांवर दीड फूट खोल खांब माती मुरुमात रोवण्यात येते.
त्यावर 200 एमएमची सळई टाकून प्रत्येक दीड फुटावर बांबूचा आधार देण्यात येते.
दोन खांबामध्ये एक फुटांच्या अंतरावर दोन रोपे लावण्यात आली आहेत.
ड्रॅगन फ्रूटला रात्री 9 ते सकाळी 7 वाजेपर्यंत फुले येतात.
ड्रॅगन फ्रूटला आठशे ग्रॅमपर्यंत फळांना सव्वादोनशे ते दीडशे रुपयांपर्यंतचा भाव ग्रेडनुसार मिळतो.
धोका कमी आणि उत्पन्न अधिक असल्याने शेतकरी ड्रॅगन फ्रूटला पसंती देत आहे.