Photo: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भव्यदिव्य समागम सोहळ्यात उपस्थिती
56 वा निरंकारी वार्षिक संत समागम सोहळा यंदा औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन येथे आयोजित करण्यात आला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती पाहायला मिळाली.
यावेळी निरांकारी माता सुदीक्षाजी महाराज आणि राजपिता रमित चांदनाजी यांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आशीर्वाद घेतले.
तसेच यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या साधकांशी संवाद साधला.
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून समाजाला दिशा देण्याचे काम संत करत असतात असे मुख्यमंत्री म्हणाले.
निरंकारी मंडळातील साधक आपल्या गुरूंच्या शिकवणीनुसार निस्वार्थीपणे अखंड सेवाभाव जपण्याचा प्रयत्न करतात असे गौरवोद्गार यासमयी मुख्यमंत्री यांनी काढले.
कोरोना कालखंडात निरंकारी मंडळाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी कोरोना केंद्र उभारण्यात आली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
निरंकारी मिशनचे साधक अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबवताना दिसतात त्यातही मी कायम सहभागी होत असतो असेही यावेळी बोलताना मुख्यमंत्री सांगितले.
याप्रसंगी संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगेंद्रसिंह जुनेजा, संत निरंकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि देश प्रदेशातून आलेले 3 लाखांहून अधिक साधक उपस्थित होते.