Aurangabad News: औरंगाबादमध्ये 300 एकरवर भव्यदिव्य समागम सोहळा
महाराष्ट्राचा 56 वा प्रांतीय निरंकारी संत समागम सोहळ्याचे (Maharashtra Nirankari Sant Samagam) आयोजन औरंगाबादच्या (Aurangabad) बिडकीन डीएमआयसीमध्ये करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबादेत पहिल्यांदाच 27 ते 29 जानेवारीदरम्यान हा आध्यात्मिक सोहळा पार पडत आहे.
यासाठी सुमारे तीन लाख भाविक सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तर बिडकीन डीएमआयसीतील 300 एकर जागा त्यासाठी घेण्यात आली आहे.
मुख्य सभामंडप तब्बल तीन लाख चौरस फुटांचा उभारला आहे.
विशेष म्हणजे या भव्यदिव्य सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह देशभरातील आणि विदेशातील भक्त उपस्थित आहे.
यावेळी संत निरंकारी मिशनच्या आध्यात्मिक प्रमुख सद्गुरू माता सुदीक्षाजी आणि निरंकारी राजपिताजी यांचे मार्गदर्शन भाविकांना लाभत आहे.
राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी देखील या भव्य सोहळ्यास भेट देऊन, सुदीक्षा माताजींचे पूजन केले.
या भव्य सोहळ्यास विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील भेट दिली आहे.
या सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.