PHOTO: औरंगाबादमध्ये निवासी डॉक्टरांकडून कॅन्डल मार्च
दरम्यान या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत असून,निवासी डॉक्टरांकडून या घटनेचा निषेध केला जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबादमध्ये देखील निवासी डॉक्टरांकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.
औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयात कॅन्डल मार्च करण्यात आला.
घाटी रुग्णालयाच्या परिसरात हातात कॅन्डल घेऊन निवासी डॉक्टरांनी यवतमाळच्या घटनेचा निषेध केला.
यावेळी मोठ्या प्रमाणात निवासी डॉक्टरांची उपस्थिती पहायला मिळाली.
यावेळी निवासी डॉक्टरांनी या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडे आपल्या मागण्याची दखल घेऊन उपाययोजनावर अंमलबजावणी करण्याची मागणी केली.
तर निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या सुरक्षारक्षकांची संख्या वाढवावी आणि वेळोवेळी त्यांच्या कामांचे मूल्यमापन व्हावे अशी मागणी केली.
तसेच रुग्णालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्वांची मेटल डिटेक्टरद्वारे सखोल तपासणी करावी, व धारदार आणी जीवघेणे शस्त्र बाळगत नसल्याची खात्री करावी अशी मागणी केली.
सोबतच पास सिस्टीम लागू करावी व एका रुग्णांसोबत एकाच नातेवाईकाला प्रवेश द्यावा,अशीही मागणी केली.