PHOTO: शाहरूखच्या 'जवान' चित्रपटाच्या 10 मिनटांच्या दृश्यासाठी औरंगाबादमध्ये 30 कोटींचा खर्च
औरंगाबाद येथे झालेल्या 'जवान' चित्रपटाच्या शुटिंगसाठी 15 दिवस 600 जणांचे युनिट अहोरात्र कार्यरत होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'जवान' चित्रपटाचे चित्रीकरण सलग 10 दिवस चालले.
त्यातील 10 ते 12 मिनिटांच्या ॲक्शन सीन चित्रपटात दाखविण्यात येणार आहे.
यासाठी औरंगाबादेत 30 कोटींची उलाढाल झाली आहे.
ॲक्शन सीनमध्ये स्फोटाने यात 50 जुन्या स्कार्पिओ उडविण्यात आल्या.
यासाठी 20 ते 25 कंटेनर, 20 दुचाकी भाड्याने घेण्यात आल्या होत्या.
याशिवाय अॅपेरिक्षापासून ते क्रेन, जेसीबी, रोडरोलरपर्यंत सर्व तयार ठेवण्यात आले होते.
धरम सोनी रेड चिली प्रॉडक्शन हेड, प्रतिक रावल, एक्झिक्युटिवे प्रोडूसर, किशोर निकम, इम्रान शेख प्रॉडक्शन मॅनेजर, अक्षय अहीरराव रज्जाक, भरत साळुंके, अनिकेत पाटेकर, साद शेख यांनी याबाबत माहिती दिली.
शहरातील 2 स्ट्रार, 3 स्टार, 5 स्टार हॉटेल 15 दिवस बुक होते.
यामुळे स्थानिक 200 पेक्षा अधिका लोकांना रोजगार मिळाला.
स्थानिक 50 ते 70 चारचाकी रोजच्या प्रवासासाठी बुक करण्यात आल्याने, याचा फायदा स्थानिकांना झाला.