Aurangabad News: औरंगाबाद महानगरपालिकेची अनधिकृत केबलविरुद्ध धडक कारवाई
पथदिव्यांवरील अनधिकृत केबलविरुद्ध औरंगाबाद महानगरपालिकेने (Aurangabad Municipal Corporation) पुन्हा एकदा धडक कारवाईची मोहीम सुरु केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोमवारी मनपाच्या पथकाने तीन वेगवेगळ्या झोनमध्ये कारवाई करून दिवसभरात तब्बल 10 हजार 170 मीटर केबल काढून जप्त केले आहे.
अतिक्रमण विभाग, विद्युत विभाग व वॉर्ड अधिकारी यांच्या पथकामार्फत ही कारवाई करण्यात आली.
झोन क्रमांक 1, 4 आणि 7 मध्ये ही मोहीम राबवून 10 हजार 170 मीटर अनधिकृत केबल्स काढून जप्त करण्यात आले.
विशेष म्हणजे ही मोहीम 30 जानेवारीपर्यंत चालणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मनपा प्रशासनाने शहरात 28 नोव्हेंबरपासून चार ते पाच दिवस विशेष मोहिम राबवून विद्युत खांबांवरील केबल्स हटविल्या होत्या.
तर अता पुन्हा अशीच कारवाई सुरु करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महापालिकेला विजेच्या खांबांवरील अनधिकृत केबल काढण्याचे आदेश दिले होते.