PHOTO: नुकसानग्रस्त भागाची पाहणीसाठी कृषिमंत्री सत्तार पोहचले बांधावर
औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात देखील काही भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी संध्याकाळी वैजापूर येथील नुकसानग्रस्त भागात जाऊन आढावा घेतला.
यावेळी त्यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
याचवेळी शेतकऱ्यांनी देखील आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या.
यावेळी सत्तार यांनी परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
पंचनामा करीत असतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही दिल्या.
गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव, रांजणगावातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी.
सोबतच वैजापूर तालुक्यातील भग्गाव, लाडगाव, नांदूरढोक, कापूस वडगाव या गावातील शिवार परिसरातील शेत बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.