PHOTO: पालकमंत्री शासकीय रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यावर आले अन् दातांचे उपचारही करून गेले
यावेळी भुमरे यांनी औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व वैद्यकीय रुग्णालय, दंत रूग्णालय व कर्करोग घाटी रुग्णालयातील वैद्यकीय सुविधाची पाहणी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुपर स्पेशालिटी इमारत, अपघात विभाग,प्रसूती विभागतील विविध सुविधांचा आढावा बैठकीत घेतला.
दरम्यान याचवेळी त्यांनी दंत रूग्णालयात पाहणी दरम्यान आपल्या दातांवर उपचार सुद्धा करून घेतले.
त्यामुळे पालकमंत्री यांनी स्वतः शासकीय रुग्णालयाच्या उपचार केल्याने चर्चेचा विषय बनला.
तर याचवेळी पालकमंत्री भुमरे यांनी हर्सूल कारागृह येथे भेट देऊन कारागृहाची पाहणी केली.
दरम्यान औरंगाबाद येथील सैनिकी सेवापुर्व प्रशिक्षण संस्थेस भेट देऊन पाहणी केली
सोबतच भुमरे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय औरंगाबाद (ग्रामीण) येथे भेट देऊन आढावा बैठक घेतली.
याचवेळी पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद (शहर) येथे पोलिस आयुक्तालयाकडून राबविण्यात येणारे विविध उपक्रम, योजना, सुविधांचा आढावा घेतला.