PHOTO: औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीकडून जनआक्रोश आंदोलन
औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हे आंदोलन करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी औरंगाबाद शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, वाढता भ्रष्टाचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि महिलांचा होणारा अपमान या प्रमुख मुद्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
तर यावेळी औरंगाबाद शहर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला.
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी जिल्हा कमिटीच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी महिला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
तर यावेळी आंदोलक महिलांनी गॅसवर स्वयंपाक करत महागाईचा निषेध केला.
तर यावेळी 'या सरकारचे करायचं काय, खाली मुंडके वरती पाय', 'राज्यपालांची हकालपट्टी झालीच पाहिजे', असा घोषणाबाजी करण्यात आली.