PHOTO: अनधिकृत केबल्स विरोधात औरंगाबादमध्ये कारवाई
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने शहरात अनधिकृतपणे टाकलेल्या केबल्स (ओव्हरहेड केबल्स) काढण्याची मोहीम हाती घेतली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहापालिकेच्या तीन पथकांनी मंगळवारी शहराच्या विविध भागांत कारवाई केली.
दिवसभरात तब्बल 20 हजार 620 मीटर केबल काढल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
अनेकदा हे केबल अपघातांसाठी कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले होते.
औरंगाबाद महानगरपालिकेच्या पथकाने 12 वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत अनधिकृतपणे टाकलेल्या केबल्स काढल्या.
शहरातील सर्वच भागांत विद्युत खांबांवरून मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे केबल टाकण्यात आलेले आहेत.
हे केबल काढण्याची मोहीम आठवडाभर चालणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.
या मोहिमेदरम्यान आवश्यकता भासल्यास गुन्हेही दाखल करा, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.