Photo: औरंगाबादच्या गेवराई पायगा गावात तंबाखू,दारूसह गुटखाबंदीचा ठराव
औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा ग्रामपंचायतमध्ये देखील आज मंगळवारी पहिली महिला ग्रामसभा पार पडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसरपंच साबळे यांच्या अध्यक्षतेखाली महिलांची ग्रामसभा घेण्यात आली.
यावेळी गावातील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
तर या पहिल्या महिला ग्रामसभेत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आली असून, ज्याची आता जिल्हाभरात चर्चा होऊ लागली आहे.
गावात दारूबंदी, गुटखाबंदी, सिगरेट, बिड्या आणि तंबाखूसह नशायुक्त पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बंदी घालण्यात आलेल्या पदार्थांची विक्री करताना आढळून येणाऱ्या व्यक्तीला पन्नास हजार रुपये दंड ठोठवण्यात येणार असल्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.
याचवेळी गावात होणाऱ्या विविध विकास कामांमध्ये जो अडथळा निर्माण करेल त्याला कुठलाही शासकीय लाभ मिळणार नाही, असाही निर्णय घेण्यात आला आहे.