Photo : गुंतवणुकीसाठी आलेली चीनची कंपनी औरंगाबादचे खड्डे पाहून अर्ध्या रस्त्यातून परतली
पण शहराच्या याच वेगाने होणाऱ्या विकासात रस्त्यांवरील खड्ड्यांनी मात्र खोडा घातला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबादच्या बिडकीन येथे जागा पाहण्यासाठी आलेले चिनी उद्योगांचे पथक हे पैठण रस्त्यांवरील खड्डे पाहून अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरल्यामुळे औरंगाबादची मोठी नाचक्की झाली आहे.
औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून गाजत आहे.
आतापर्यंत अनेकदा उद्घाटने झाली पण प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली नाही.
विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यात दोन केंद्रीय आणि राज्यातील सरकारमधील तीन कॅबिनेट मंत्री आहेत.
मात्र असे असतांना शहरातील आणि ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न काही मार्गी लागतांना दिसत नाही.
औरंगाबाद-पैठण रस्ता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघातील असूनही, रस्त्यांवरील खड्डे आणि चौपदरीकरणाचा मुद्दा कायम आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे उद्घाटन केले होते.
मात्र यापूर्वी सुद्धा अनेकदा असे उद्घाटन सोहळे पार पडल्यानंतरही रस्ता बनला नसल्याने, आतातरी हा रस्ता होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.