Photo: सेक्रेड गेम्समुळे चर्चेत आलेल्या राजश्री देशपांडेने ऊस कामगारांच्या मुलांसाठी उभी केली शाळा
मात्र अभिनयाच्या पलीकडे राजश्री करत असलेल्या सामाजिक उपक्रमांची देखील अनेकदा चर्चा होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिच्या अशाच एका सामाजिक उपक्रमांने सर्वांचे मनं जिंकले आहे.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज औरंगाबादच्या ढोरकीन तांड्यावर राजश्रीच्या हस्ते एका जिल्हा परिषदेच्या शाळेचे लोकार्पण सोहळा पार पडला.
विशेष म्हणजे या शाळेची ईमारत राजश्रीने स्वखर्चाने उभी केली आहे.
अंदाजे 500 लोकसंख्या असलेल्या औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील ढोरकीन तांड्यावरील जिल्हा परिषदेची शाळा मोडकळीस आली होती.
शाळेतील काही शिक्षकांनी याबाबत राजश्रीशी संपर्क करत, शाळेची अडचण सांगितली.
गावकऱ्यांना आपण दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचे राजश्रीने ठरवले आणि गावकऱ्यांच्या मदतीने शाळेच्या कामाला सुरवात झाली.
सुसज्ज असे वर्ग,खेळण्यासाठी मैदान अशा या निसर्गरम्य वातावरणातील शाळेचे आज लोकार्पण सोहळा पार पडला.
मराठवाड्यातलं पांढरी आणि अमनी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचा राजश्रीने कायापालट केला होता.
त्या नंतर आता ढोरकीन येथील तांड्यावर शाळेसाठी नवीन ईमारत उभी केली आहे.