PHOTO: सपाटीकरणाची परवानगी असताना 9 एकर डोंगर पोखरले, थेट जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई
या एजन्सीने सपाटीकरणाच्या नावाखाली थेट डोंगराचा 9 एकर भाग पोखरला असल्याचे समोर आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा प्रकार जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना कळताच त्यांनी शुक्रवारी दुपारी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी डोंगर सपाटीकरणाच्या नावाखाली 9 एकर 9 गुंठे डोंगर पोखरल्याचा प्रकार दिसून आला आहे.
6 सप्टेंबरला या कामाची मुदत संपली, तरीही सपाटीकरणाचे काम सुरू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना शंका आली होती.
त्यामुळे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी स्वतः जाऊन केली कारवाई.
यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत 4 हायवासह जेसीबी आणि पोकलेन जप्त करण्यात आले.
सपाटीकरणाचे काम करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
थेट जिल्हाधिकारी चव्हाण यांनीच स्टिंग ऑपरेशन करीत अवैधरीत्या डोंगर पोखरणाऱ्यांवर कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.