PHOTO: काय सांगता! एकाच ठिकाणी वीस मिनटात 25 दुचाकींचे अपघात
मोसीन शेख
Updated at:
06 Oct 2022 01:48 PM (IST)
1
औरंगाबाद-पैठण रोडवर आज सकाळी 20 मिनिटांत 25 अपघात घडल्याचे पाहायला मिळाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सामंतर जलवाहिनीचे काम सुरु असल्याने रस्त्यावर माती आणि चिखल झाला आहे.
3
रात्री झालेल्या पावसामुळे रस्त्यावर चिखल झाले आहे.
4
त्यामुळे आज सकाळी एकामागून-एक द्दुचाकी स्लीप होऊन अपघात झाले.
5
ढोरकीन गावातील कुलस्वामिनी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या अक्षय हॉटेलजवळ हा प्रकार घडला.
6
त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळाला.
7
काही नागरिकांनी रस्त्यावर गाड्या आडव्या लावून, संताप व्यक्त करत रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.
8
नागरिकांचा संताप पाहत कंत्राटदाराने रस्त्यावरील चिखल जेसीबीच्या साह्याने दुर केले.
9
त्यानंतर अखेर वाहतूक सुरुळीत करण्यात आली आहे.