PHOTO: जगभरातील पर्यटकांना भुरळ घालणारी औरंगाबाद शहरातील 10 पर्यटन स्थळे
औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ उद्यान आणि प्राणीसंग्रहालया (Siddharth Garden and Zoo) मराठवाड्यातील नागरिक पर्यटनासाठी येतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबाद शहरातील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाणचक्की (Panchakki) म्हणजेच पाण्यावर चालणारी चक्की पाहण्यासाठी देखील रोज हजारो पर्यटक येत असतात.
डोंगरात खोदलेली औरंगाबाद बौद्ध लेणी (Buddha Leni Aurangabad) ही बीबी का मकबरऱ्यापासून काही अंतरावर असून, याठिकाणी देखील पर्यटकांची वर्दळ असते.
'दखन का ताज' म्हणून ओळख असलेल्या बीबी का मकबरा (Bibi Ka Maqbara) पाहण्यासाठी देखील रोज हजारो पर्यटक औरंगाबाद शहरात येत असतात.
औरंगाबादपासून 35 किलोमीटरवर असलेल्या दौलताबाद किल्ल्यावर (Daulatabad Fort) देखील राज्यासह देशभरातील पर्यटक येतात.
औरंगाबादपासून 102 किलोमीटरवर असलेली जगप्रसिद्ध अजिंठा लेणी (Ajanta Caves) पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येत असतात.
औरंगाबादपासून 32 किलोमीटरवर असलेल्या वेरूळ लेणी (Ellora Caves) पाहण्यासाठी देखील देशातील विविध भागातून पर्यटक येत असतात, सोबतच वेगवेगळ्या देशातील पर्यटकांची देखील याठिकाणी गर्दी पाहायला मिळते.
प्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग (Grishneswar Jyotirlinga Temple) औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. याठिकाणी रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.
औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरातील (Bhadra Maruti Temple Aurangabad) झोपेच्या मुद्रेत हनुमानजीची मूर्ती आहे. ज्यामुळे हे मंदिर पर्यटकांचे मुख्य केंद्र आहे.
औरंगाबादपासून 50 किलोमीटरवर असलेला आशिया खंडातील सर्वात मोठा मातीचा धरण म्हणून ओळख असलेला जायकवाडी धरण (Jayakwadi Dam) पाहण्यासाठी देखील पर्यटक पैठणला भेट देतात.