Photo: गस्तीवरील पोलिसांच्या व्हॅनला अपघात; चार पोलीस कर्मचारी जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Feb 2023 12:44 PM (IST)
1
औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या गंगापूर पोलीस ठाण्यातील पोलीस व्हॅनचा अपघात झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
बगडी- नेवरगाव रोडवर गस्त घालत असताना वळणावर गंगापूर पोलीस ठाण्याची व्हॅन उलटून अपघात झाला.
3
या अपघातात चार पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले.
4
ही घटना रविवारी घडली असल्याची माहिती समोर आली आहे.
5
दुपारी एक वाजेच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशनवरून निघून बगडी-नेवरगाव रोडवर पोलीस गस्त घालत होते.
6
यावेळी वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून व्हॅन उलटली.
7
व्हॅनमधील पोलिस उपनिरीक्षक शकील शेख, अनिल शिंदे, पदमकुमार जाधव, पोहेकॉ. विजय नागरे पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले.
8
या जखमी पोलिसांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले.
9
दरम्यान, याची नोंद गंगापूर पोलिसांत करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.